फॉलोअर

शुक्रवार, ३० मे, २०२५

The Centenary of the Lake Arthur Hill

 





ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात आता
 विकास पवार लिखित भंडारद-याची धरणगाथा 

      "मृत्यूनंतर मी नरकात गेलोतरी चांगल्या पुस्तकांच्या माध्यमातून तिथेही स्वर्ग निर्माण करेल" स्वातंत्र्य संग्रामातील टिळकयुगाचे अध्वर्यू ज्यांना म्हटल्या जाते त्या लोकमान्यांचे हे उद्गार आहेत.

        ग्रंथसंग्रह करण्याची व तो संग्रह जतन करण्यासाठीच विशेषकरून वास्तू बांधण्याची अद्वितीय अध्ययनशीलता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनभर जोपासली. 'ग्रंथ हेच गुरु' या उद्धरणाची सत्यता तिन्ही काळात, युगानुयुगे सर्व जगात अबाधित आहे. या ग्रंथ गुरूंच्या जागतिक विद्यापीठाचा दर्जा ऑक्सफर्ड विद्यापीठातील ग्रंथालयाला दिल्या जातो. पृथ्वीवरील या ग्रंथरुपी महागुरूंच्या दालनात इतिहास संशोधक श्री विकास पवार यांच्या Century of the Lake Arthur Hill या ग्रंथास दाखल होण्याचा मान मिळाला आहे. शतकानूशतके विचारवंत,लेखक संशोधक व अभ्यासकांनी ज्याच्या पायऱ्यांवर आपली पाऊले ठेवली त्या पवित्रस्थळी एखाद्या पुस्तकाची नोंद होणे ही बाब त्या पुस्तकाच्या नि लेखकाच्या सन्मानाची तद्वताच त्याच्या जागतिक स्वीकारार्ह्यतेची निदर्शक अशी मानल्या जाते.

    अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण आश्रम शाळेतील इतिहास संशोधक विकास पवार यांच्या ' Century of the Lake Arthur Hill ' या ग्रंथास ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात सूचीबद्ध होण्याचा बहुमान नुकताच प्राप्त झाला. त्यांच्या या पुस्तकात भंडारदरा धरणाच्या निर्मितीपासून आजच्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामापर्यंतचा विस्तृत आलेख मांडलेला आहे. दुर्गम समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील शेंडी परिसरात स्वातंत्र्यपूर्व काळात स्थानिकांच्या कष्ट सहाय्यातून ब्रिटिशांनी निर्मिलेल्या लोककल्याणकारी धरणाची गाथा यानिमित्ताने सातासमुद्रापार वाचली जाणार आहे.

  ज्यांची जीवनवेल मूलभूत चरितार्थ वा राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक वगैरे विविधांगांनी बहरून आली; अगदी आजतागायत सह्याद्रीच्या भौगोलिक वरदानप्राप्त कुशीतील प्रवरा नदी व तिच्या अस्सल प्रवरापरिसरातील जीवनदायी भंडारदरा धरणाचा जीवनरस प्राशन करून प्रतिप्रवरा परिसरांची प्रतिष्ठापना ज्यांनी केली. त्या दूरदूरच्या सपाट मैदानी प्रदेशातील धरणलाभार्थींना कृतज्ञतेचा बोधपाठ यानिमित्ताने मिळावा ही अपेक्षा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्य...