फॉलोअर

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

 सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्या एका मित्राने "आता तुम्हाला शहाणपण येईल "अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. 'चाळीशी नंतरचा आयुष्यकाल कठीण असतो' असा मतितार्थ कदाचित त्याच्या बोलण्यामागे असावा.      2025 पर्यंतच्या या दहा वर्षांतील कालावधीत त्याची ती शुभेच्छावजा खोचक प्रतिक्रिया अधिकाधिक फलद्रूप होताना मी पाहत आलो. अनुभवत आलो. साहत आलो.मन बुद्धीचा विवेकी पिंड घडविणाऱ्या कठीण परिस्थिती विषयी कृतज्ञता बाळगत आलो.कर्तव्यकर्मांच्या  का होईना या अपरिहार्य प्रवाहात वाहवत जाताना पुष्कळांचा संपर्क कमी झाला. तुटला. औपचारिक बनला. अत्याधुनिक संप्रेषण प्रणालीतल्या अनेक समुहात असूनही नसल्यासारखी माझी स्थितिशीलता *"हे  आपल्या समुहात आहेत का"* अशा सांशक, उपहासादी उद्धरणांनी प्रत्ययास आली.

             वाघ सिंहादि हिंस्त्र पशूंचा खेळ घेताना सर्कशीच्या तंबूतील वीज गेली. रिंगमास्टर आक्रमक  प्राण्यांत अडकला. थोड्याच वेळात हाहाःकार उडेल अशी स्थिती असताना कोणत्यातरी दैवी दृष्टीच्या माणसाने प्रकाश पाडणारी काडी चेतवावी. त्याचे अनुकरण उर्वरित समुहाने करावे. रिंगमास्टरला जीवघेण्या अरिष्टापासून वाचवावे. तशा कोणत्यातरी शुभचिंतक,सहृदयी मित्र स्नेह्याने लक्षात ठेवलेला वाढदिवस त्याच्या एका शुभेच्छेने सार्वजनिक व्हावा. असे आज माझ्याबाबतीत घडले. या दिवशी आपणा सर्व; मित्र-स्नेहीजनांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात. आपल्या गुरुवर्यांचाही शुभेच्छारुपी आशीर्वाद मिळाला. खरोखरच गुरुंशी असलेले नाते हे आजीवन असते. कौतुक प्रशंसेची, विविध उपमा-उपमानांची स्तुतीसुमने उदात्त वृत्तीने माझ्या ओंजळीत आपणां सर्वांनी टाकलीत. डॉ. नसतानाही तशी उपाधी दिलीत.अंतःकरणपूर्वक आपण प्रदान केलेली सदभावनांची ही सत्वशक्ती ; माझ्या आयुष्यात घडणार्‍या घटना प्रसंगात मनाचे समत्व राखण्यास मला  बळ देईल. आपल्या या अफेड देयदाना बद्दल मी आपला कृतज्ञ आहे. 

विश्व मंडलात सर्व काही संग्रही राहते. म्हणूनच वाढदिवशी माझ्यासाठी आपण व्यक्त केलेल्या शुभेच्छा विश्व मंडलात सुरक्षा ठेव म्हणून माझ्यासाठी सुरक्षित असणार आहे त्यांचा सुपरिणाम आपणांसही मिळो या कृतज्ञतेसह, शुभेच्छांसह आपणांस धन्यवाद देतो .

       आपला सहाध्यायी, विद्यार्थी 

        सुरेश भिंगारदिवे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

 सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्य...