बाजार भरलेला असूनही
काही घ्यायला
मन होत नाही.
आता गरम खिसाही
आतल्या आत
पोळवू लागला आहे हात.
घरट्याच्या कवचाचे
काठिण्य दुभंगवायला,
एकेक मजबूत मेढ
जमीनदोस्त करून
करपवून टाकायला ;
कधीची वाट शोधतोय
तप्त लाव्हा बाहेर यायला.
दगडपुत्र भिंगारदिवे
सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा